Illustration

बाबादेव खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती, वाके
ता. मालेगाव, जि. नाशिक

शेतकरी वर्गाची फसवणुक व लुट होवु नये, त्यांचे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा या करीता महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 व महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) नियम 1967 या कायद्याअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समित्यांची स्थापन झालेली आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था असुन बाजार समितीचे कामकाज हे वरील कायद्यातील नियमांनुसार चालते.

कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाजावर तालुका स्तरावर म, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (Assistant Registrar) यांची, जिल्हा स्तरावर म. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (Deputy District Registrar) यांची व राज्य स्तरावर म. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची नियुक्ती असते. वरीष्ठ कार्यालयाकडुन बाजार समितीचे कामकाजावर नियंत्रण ठेवले जाते.

Thumb